परंडा (प्रतिनिधी) - येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील डीसीपीएस धारक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाराष्ट्र सरकारने 31 ऑक्टोबर 2005 रोजी जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अन्यायकारक डिसीपीएस योजना कर्मचाऱ्यावर लादली. ज्यामुळे अनेक कर्मचारी बांधव जुन्या पेन्शनपासुन वंचित राहिले. जो त्यांचा निवृत्तीनंतरचा अधिकार होता तो नाहीसा झाला आहे. सर्वांची एकच मागणी आहे. सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी परंतू जाणुन बुजुन सरकारने या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणुन महाविदयालयातील कर्मचाऱ्यांनी 31 ऑक्टोबर हा काळा दिवस म्हणुन काळ्या फिती लावून पाळण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समितीच्या वतीने काळा दिवस म्हणून पाळला व सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.