भूम (प्रतिनिधी)- भूम पार्डी रोडवरील अलमप्रभू कमानी शेजारी भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहनाने जनावरांच्या कळपास जोरदार धडक दिल्याने एक रेडा अत्यवस्थ तर इतर पाच जनावरे अति गंभीर जखमी झाले. 

सविस्तर वृत्त असे की, भूम येथील पशुपालक अमोल हरी साठे व दीपक हुरकुडे हे दररोज प्रमाणे शेतातून आपली जनावरे घेऊन येत असताना सायंकाळचे 5.30 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनचालकाने त्याची स्विफ्ट गाडी क्रमांक डब्ल्यु.बी. 02 ए.ए. 4648 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने जनावरांच्या कळपास जोराची धडक दिली. या धडकेत दीपक हुरकुडे यांची एक म्हैस, एक रेडा व एक कालवड तर अमोल हरी साठे यांचे दोन म्हैस व एक रेडी असे एकूण सहा जनावरे अति गंभीर जखमी झाले आहेत. गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


 
Top