तुळजापूर (प्रतिनिधी)-   मराठा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी श्री तुळजाभवानी मातेने सरकार व सर्व पक्षांना सदबुघ्दी द्यावे असे साकडे घातल्याचे सांगुन मराठे आता आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटणार नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर मराठा समाजा  समोर बोलताना केले.

धाराशिव हुन  तुळजापूर  दुपारी 12.30वा आगमन होताच  येथील छञपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ फटाक्याची प्रचंड अतिषबाजी करण्यात आली नंतर श्रीतुळजाभवानी मंदीरात जावुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. नंतर श्रीतुळजाभवानी मंदिर मुख्य प्रशासकीय कार्यालय समोर   मराठा बांधवांशी संवाद साधताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की, देवी शक्ती दाती आहे तिच्या  दर्शनाने बळ प्राप्त होते. अन्याय होतो तिथे देवी अन्याय विरोधात लढणा-यांच्या पाठीशी उभी राहते. मराठा समाजास आरक्षण मिळे हा आरक्षण लढा ठेवायाचा आहे. आपण  मराठे आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटायाचे  नाही असे यावेळी मराठ्यांना आवाहन केले. आम्ही देवीचे सेवक भक्त आहोत. आम्हाला फक्त देविने लढण्याचे बळ द्यावे. आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटायाचे नाही अशी  यावेळी म्हणाले. यावेळी मनोज जरांगे पाटलांचे स्वागत सकल मराठा समाजाचावतीने महेश गवळीनी केले.तर यावेळी सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


 
Top