येणेगुर (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव बाबुराव बिराजदार यांच्या संकल्पनेतून दि.17 ऑक्टोबरपासून शारदोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.  

येणेगूर येथे श्री परमहंस शिक्षण संस्थेचे सचिव बाबुराव बिराजदार यांच्या कल्पनेतून मागील 43 वर्षापासून अविरत अखंड शारदोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. यावर्षीचे व्याख्यानमालेचे हे 44 वे वर्ष आहे. ही शारदोत्सव व्याख्यानमाला दि. 17 ते  21 ऑक्टोबर  या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.  व्याख्यानमालेची सुरुवात दि.17 रोजी  कमलाकर भोसले माजी मुख्याध्यापक तथा अध्यक्ष रोटरी क्लब उमरगा यांच्या गुरु, शिष्य या विषयाने होणार आहे. दुसरे व्याख्यान दि.18  रोजी मच्छद्रिंनाथ शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरूम यांचे सामाजिक समस्या व कायद्याची भूमिका या विषयावर, दि.19 रोजी प्रवीण स्वामी, मुख्याध्यापक यांचे  भारतीय संस्कृती व आपण, दि.20 रोजी जिल्हा मराठी पत्रकार संघ'चे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांचे  पत्रकारिता व विद्यार्थी या विषयावर तर शेवटचे व्याख्यान  प्रा. मधुकर यादवराव गुरव यांचे  प्रवचनातून व्यक्तिमत्व विकास या  विषयावर व्याख्यान होणार आहे. सुरुवातीचे चार व्याख्यान दुपारी 2 वाजता तर शेवटचे व्याख्यान सकाळी नऊ वाजता कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगुर येथे होणार आहे.  तरी परिसरातील माजी विद्यार्थी व नागरिक यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव, अध्यक्ष, मुख्याध्यापक व संस्कृतीक विभाग यांच्यातर्फे करण्यात आले. 


 
Top