तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील साई हाँस्पीटलचे प्रमुख अस्थिरोग तज्ञ डॉ. पवन शिवाजीराव पाटील 47 हे आपल्या हाँस्पीटलमध्ये शनिवार दि. 14 ऑक्टोबर रोजी मृत अवस्थेत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शवविछेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मुत्युचे गुढ उलगडणार आहे.
राञी दवाखाना बंद केल्यानंतर डाँ. पाटील हे आपल्या खोलीत आरामसाठी गेले होते. सकाळी ते आले नसल्याचे पाहुन रुग्णालयातील कर्मचारी त्यांच्या खोलीत सकाळी अकरा वाजता गेले असता उठवत असताना ते न उठल्याने पोलिसांना सुचना दिली तपासणी अंती ते मयत झाल्याचे दिसुन आले. डाँ पवन शिवाजीराव पाटील यांचे नळदुर्ग रस्त्यावर साई हाँस्पीटल नावाचे हाँस्पीटल असुन असुन येथे ते पंधरा वर्षापासुन दवाखाना चालवत होते. ते मितभाषी व सहसा कुठे मिसळत नसत आपण व आपला दवाखाना बरे या पध्दतीने ते वागत असत. त्यांच्या या गुढ मुत्युने शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दुपारी त्याचे शवविछेदन करण्यात येवुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविछेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मुत्युचे गुढ उलगडणार आहे.प्रथम दर्शनी हदय विकाराचा तीव्र झटका येवुन त्यात त्यांचा मुत्यु झाल्याचा अंदाज पोलिसाकडुन व्यक्त केला जात आहे.