तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मंदिरातील तब्बल बारा वर्षापासुन बंद असलेला श्री टोळ भैरवनाथ मंदिरा समोरुन मंदिरात जाणारा दरवाजा अखेर शुक्रवार दि. 13 रोजी सांयकाळी विश्वस्त आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उघडल्याने भाविक पुजारी अधिकारी यांची सोय होणार आहे. सदरील दरवाजा सुरक्षानावाखाली बंद करण्यात आला होता. हा दरवाजा उघडावा म्हणून अनेक आंदोलने झाले. अखेर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर अनेक वर्षांपासून बंद दरवाजा उघडला..
यामुळे भाविकांची अधिक सुविधा होणार आहे. काळानुरूप काही निर्णय घेण्यात येत असतात पण कलोचीत आणि परिस्थितीनुरूप असे निर्णय बदलले तर त्याचा लाभ होत असतो. अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.