तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर टोळगे उंडाळे परिवारा कडुन  छञपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्य अभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पुर्ण झाल्याच्या स्मरणार्थ बारा होल्ट फिक्सल लाईट माध्यमातून राजेशहाजी महाध्दार वर विद्युत रोषणाई माध्यमातून विद्युत शिवराज्य सोहळा विद्युत रोषणाई करण्यात आली होती ती आज भाविकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली.  

पुण्यातील  टोळगे उंडाळे परिवार यांच्या कडुन मागील अकरा वर्षा पासुन श्रीतुळजाभवानी दोन्ही  महाध्दार,मंदीर शिखरे परिसर निंबाळकर दरवाजा येथे आकर्षक अशी विद्रोषणाई मोफत वर्षभर साठी करुन दिली जाते. त्यांच्या या तिसरी पिढीने परंपरा पुढे चालु ठेवली आहे.  हे काम सेवा रुपी प्रथमता विजय उंडाळे नितीन उंडाळे सोमनाथ उंडाळे संजय उडाळे यांनी सुरु केले आता अकरा वर्ष झाले तिसरी पिढी ही सेवा देवीचरणी रूजू करीत आहेत.  


आमचे वडील पुर्वी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात देविदर्शनार्थ येत पण येथे कशीतरी विद्युत रोषणाई केली जात असे या पार्श्वभूमीवर आपल्या कुलस्वामिनीचे मंदिर नवराञोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाई ने उजळुन निघावे या हेतुन उंडाळे व टोळगे परिवार गेली अकरा वर्षा पासुन ही सेवा करीत आहे.


 
Top