परंडा (प्रतिनिधी)- शहर व तालुक्यातील संजय गांधी निराधार (दिव्यांग) अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे जुलै 2023 पासून अद्यापपर्यंतचे वेतन तात्काळ वाढीव अनुदानासह जमा करावे, अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाचे वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाने करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे वेतन जुलै महिन्यापासून मिळालेले नाही. तसेच आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या विविध सणासुदीच्या मुहूर्तावर रखडलेले वेतन धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ वाढीव निधी सह वितरित करावे अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आली. यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके, तानाजी सांगडे,गोरख देशमाने, गणेश जाधव,  रावसाहेब खरसडे, संतोष कुलकर्णी, अशोक भराटे, मधुकर मोटे आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.


 
Top