तुळजापूर (प्रतिनिधी)-सुराज्य मानवता संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी तुळजापूर येथे घेण्यात आली. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन, महंत मावजीनाथ महाराज यांच्या मठास भेट देऊन निसर्गपूजक प्रार्थना आणि एकत्र संघटित काम करण्यासाठी आवश्यक संकल्प यावेळी करण्यात आला.
सुराज्य मानवता संघ या संघटनेचा माध्यमातून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व जनसामान्यांच्या हितासाठी न्याय हक्क मिळवून देणे व इतर कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा संकल्प करून पुढील वाटचाल निश्चित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्वसामान्य कुटुंबातील मुले व मुलींचे शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या आता रोजगार निर्मितीसाठी त्वरित किमान एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, शेतमजुरांच्या समस्यांबाबतही यावेळी चर्चा झाली.
बैठकीस सुराज्य मानवता संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र काकडे, ॲड. दीपक वसावे, शहाजी सोमवंशी, सौ.पूजाताई चव्हाण, किशोर सागावकर, महंत बबनगीरी महाराज व इतर सदस्य उपस्थित होते.