धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील पोलीस मुख्यालय मैदानावर छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा सांगता दिनी कलाविष्कार अकादमी द्वारा हौशी छंदी गायकाचा समूह 'मेलडी स्टार्स' संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह पोलीस विभागाच्या वतीने मेलडी स्टार्स च्या कलावंतांना उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा दिल्या. 

त्यानंतर मेलडी स्टार्स चे मुख्य प्रवर्तक युवराज नळे समन्यवक रवींद्र कुलकर्णी, शेषनाथ वाघ , तौफीक शेख , शरद वडगावकर , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, फौजदार उस्मान शेख , जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पत्नी सौ. महिमा अतुल कुलकर्णी, प्रगती शेरखाने ,सौ.पल्लवी कुलकर्णी , श्रेया गायकवाड, नंदिनी गाडे, मुनीर शेख यांनी गायन केले. या मेलडी स्टार संगीत मैफिलीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती शेंडे,  जिल्हाधिकारी डॉ. सचीन ओम्बासे , सौ. अस्मिता ओम्बासे , सौ. कांवत छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रीय पोलीस अधिकारी, पोलीस बांधव उपस्थित होते . मैफिलीचे सुत्रसंचलन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले.


 
Top