तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील नवनिर्मिती अष्टभुजा प्रेरणा महिला सहकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने जागर आदिशक्तीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा उपक्रम अंतर्गत तुळजापूर मधील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या नवदुर्गांच्या सन्मान भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चिञाताई वाघ यांच्या हस्ते भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यात नेत्र तज्ञ डॉक्टर गीतांजली माने अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या उज्वला क्षीरसागर, कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवणारी फॅशन डिझायनर शीतल हंगरगेकर, स्वकर्तुत्वावर स्वतःचं ब्युटी पार्लर उभे करून अनेक तरुनींना प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनवणाऱ्या कोमल अमृतराव, जिल्हा परिषदमध्ये कला शिक्षिका म्हणून मुलींच्या अनेक कलागुणांना वाव देत त्यांना कलेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या व मुलींच्या पाठीशी खंबीरपणे असलेल्या सविता भोसले, भजनी मंडळाद्वारे विविध संतांचे भारूड भजन सर्वत्र प्रसार प्रचार करणाऱ्या मनीषा चाटूफळे, तुळजापूर कोर्टामध्ये वकिली करत अनेक गरजू महिलांना विधी सेवा पुरवणाऱ्या सहकार्य करणाऱ्या ॲड अंजली साबळे आदी कर्तृत्वान नवदुर्गांचा सन्मान सोहळा चित्राताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगडे, अर्चना वडणार, सोलापूर महापौर शोभाताई बनशेट्टी, संस्थेची सायली पाटील, भाजपाचे गुलचंद व्यवहारे, राजेश कदम सह महिला मोठ्या संखेने उपस्थितीत होत्या.