तुळजापूर (प्रतिनिधी)-   श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवातील आठव्या माळेदिनी दुर्गाष्टमी दिनी  रविवारी (दि.22)श्री तुळजाभवानीच्या मातेच्या सिंहासनावर महिषासुर  र्दीनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती शारदीयनवराञ उत्सवातील दुर्गाष्टमी या पवित्र दिनी देवी दर्शनाचा योग साधण्यासाठी प्रचंड संख्येने भाविकांनी तुळआई नगरीत एकच गर्दी केली होती. देवीने महिषासुर दैत्याचा वध केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवार (दि. 22) महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.

ही पुजा मांडण्याबाबत असे सांगितले जाते की, पती निधनानंतर  सती जाण्यास निघालेल्या अनुभूतीस अल्पायु पुञामुळे तत्कालीन समाजाने सती जाण्यापासून रोखले. त्यानंतर अनुभूतीने तप साधना

सुरु केली. त्यावेळी कुकर नावाच्या दैत्याने तिचा शीलभंग करण्याचा प्रयत्न केला असता अनुभुतीने उन्मत कुकराच्या संरक्षणासाठी तिने कुलदेवतेची आराधना केली. तेव्हा त्वरीता देवी प्रसन्न झाली व तिने अनुभुतीच्या रक्षणासाठी कुकर राक्षसाचा वध केला. हे युद्ध नऊ दिवस चालले. त्याप्रित्यर्थ देविजीच्या सिंहासनावर दुर्गाष्टमीदिनी महिषासूर अलंकार महापुजा बांधण्यात येते. महिषासूर अलंकार महापूजा ही ज्या मुळ स्वरूपातील मुर्ती आहे तीच आज वस्ञोलंकार पुजेने अवतरते. दुर्गाष्टमीनिमित्त दुपारी 3.00 वा  वैदिक होमास प्रारंभ होवून होमाचे यजमान जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे  व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले. त्यानंतर 8.वाजुन 10 मिनीटाने कोहळ्याची होम कुंडात पूर्णाहुती दिल्यानंतर या विधीची सांगता झाला. या विधीचे पौराहित्य पाठक यांच्या नेतृत्वाखाली

स्थानिक बृम्हवृदांनी  केले. 


व्हीआयपींचा सुळसुळाट ! रांगेतील भाविकांना ञास 

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील  दुर्गाष्टमी दिनी देवीदर्शनार्थ प्रचंड  गर्दी व्हीआयपीचा सुळसुळाट यामुळे सुरक्षा यंञणेवर प्रचंड ताण येवुन सुरक्षा यंञणा सतत कोलमडत होती.

आज व्यवस्थापक यांनी शटर मार्ग सिंह गाभाऱ्यात दर्शन व्यवस्था रद्द करण्याचे जाहीर प्रगटन काढुन ही येथुन मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचाऱ्यांंचे नातेवाईक सोडल्याने धर्मदर्शन रांगेतुन दर्शन घेणाऱ्या भाविकांना आठ तास दर्शनार्थ लागले. येथुन ज्यांनी कुणी भाविक सोडले त्यांचे सीसीटीव्ही फुटेज बघुन कारवाई करण्याची मागणी ञस्त भाविकांमधुन केली जात होते. काही भाविक तर जामदार खाना समोरील दरवाज्यातुन थेट गाभाऱ्यात गेले. आज व्हीआयपीची चौकशी न करता त्यांचे ओळखपञ न पाहता भाविकांना दर्शनार्थ सोडल्याने आज मंदिरात सर्वञ बेशिस्त वातावरण निर्माण झाले होते.


 
Top