धाराशिव (प्रतिनिधी)-भारत राष्ट्र समिती पक्षाचे धाराशिव मध्ये प्रभाग क्र. 7 मध्ये हनुमान चौक शाखेचे ॲड. विश्वजीत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटण करण्यात आले, या वेळी प्रमुख उपस्थिती ॲड. रुपेश माडजे यांची होती. तसेच मारुती कारकर व गौस मुलानी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. शाखा उद्घाटण कार्यक्रमाचे आयोजन निखिल चांदणे व दत्ता घोणे यांनी केले होते.

 विनायक हिप्परकर यांना या शाखेचे प्रमुख नेमले आहे. यावेळी जिल्हा समन्वयक ॲड. विश्वजीत शिंदे व ॲड. रुपेश माडजे यांच्या हस्ते विनायक हिप्परकर, चांद नाईकवाडी, योगेश नलवडे, आकाश छबिले, चंदू छबिले, प्रविण सोनवणे, प्रशांत गुजर, बाबा फकीर, बालाजी घोणे, सुनिल तट, दिपक लोमटे, पुनीत बनसोडे, सचिन सावंत, सुरज वाघमारे, अभि पाटिल, प्रशांत देशमुख इत्यादी सह अनेकांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. सदर शाखे अंतर्गत मुख्य कमिटी, युवक कमिटी, विधार्थी कमिटी, अल्पसंखाक कमिटी, ओबीसी कमिटी व मागासवर्गीय कमिटी नेमण्यात आली असुन शेतकरी कमिटी, महिला कमिटी नेमण्यात येणार आहे. भारत राष्ट्र समिती पक्ष सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार आहे. भारत राष्ट्र समिती चे नेते के. चंद्रशेखर राव यांच्या चांगल्या विचारावर व कामावर विश्वास ठेऊन अनेक लोक भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करत आहेत व पक्ष महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात काणाकोपर्यात पोंहचलेला आहे. अबकी बार किसान सरकार हा शेतकरी हिताचा नारा देत विकासाचा मुद्दा घेऊन भारत राष्ट्र समिती धाराशिव जिल्हासह संपुर्ण महाराष्ट्रात उतरली आहे.


 
Top