धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित के.टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयात व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती विषयी आपले विचार व्यक्त करताना डॉ. मसलेकर म्हणाले की“मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‌‘महात्मा' ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना ‌‘राष्ट्रपिता' असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. 9 जून, इ.स. 1964 रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. 1965सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद येथे दौऱ्यावर असताना 11 जानेवारी, इ.स. 1966 रोजी विषप्रयोग झाल्यामुळे मृत्यू झाला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा पराग कुलकर्णी, प्रा.शुभम पाटील, प्रा. गवळी मॅडम, प्रा.सौं पटेल मॅडम, अजय शिराळ, राजाभाऊ जाधव, सय्यद, सुदर्शन कुलकर्णी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top