वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारमधील सत्ताधारी व विरोधी पक्षातील मराठा खासदार आमदार मराठा आरक्षणावर ठोस  भूमिका घेत नसल्याच्या कारणाने यांच्या निषेधार्थ गांधीगिरी मार्गाने मुंडन आंदोलन पारगाव येथील सकल मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आली. 

यावेळी गावातील सर्वपक्षीय सर्व जातीच्या 35 युवकांनी स्वतःचे मुंडन करून राज्यातील मराठा खासदार, आमदारांचा निषेध नोंदविला. याचबरोबर राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी गावातील शिवसेना उप तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव मोटे, दीपक आखाडे,श्रीनिवास उंद्रे, राहुल डोके, संपत काटवटे, गणेश मोटे,सुरेश लाखे,माऊली ताटे,राजा कोळी,आबा आखाडे, धनंजय मोटे, समाधान मोटे, विशाल आखाडे, दीपक जाधव, निखिल पारगावकर, सुमंत कुलकर्णी, विठ्ठल मोटे, अमोल गावडे, अमर मोटे, गणेश डोके, बप्पा इंगळे,रामभाऊ आखाडे, नवनाथ आखाडे,स्वप्निल भैरट, अशोक जोगदंड ,सचिन मोटे, जयदीप पुरी, प्रशांत मोटे, प्रदीप मोटे, आदी गावातील तरुण उपस्थित होते.


 
Top