तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवराञ उत्सवातील  सहाव्या माळेदिनी आश्विन शुद्ध

षष्ठीनिमित्त शुक्रवार दि20रोजी  देवीजींच्या सिंहासनावर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात

आली होती. आज श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

या पूजे बाबतीत अधिक माहीती अशी की अहिमही राक्षसांनी शेषच्या आईची कवचकुंडले व राज्य हिसकावून घेतले व त्यास पाताळ लोकांतून हाकलून दिले. तेव्हा शेष देवीला शरण आला. यावेळी देवीने दिलेल्या वरदानामुळे प्रभू रामचंद्रांनी अहिमहीचा वध करून शेषास त्याचे राज्य परत केले. म्हणून देवीची सेवा बजावण्याकरिता शेषशाही पूजा मांडली जाते  जाते. राञी प्रक्षाळ पुजे नंतर देविचे महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजी बुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यानंतर सहाव्या माळेच्या धार्मिक विधीची सांगता झाली. तत्पुर्वी पाचव्या माळे दिनी गुरुवार दि. 19 ऑक्टोबर रोजी देविजींच्या मंदिरात मोर वाहनावर छबिना काढण्यात आला.


 
Top