तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवराञोत्सवातील सहाव्या माळे दिनी शुक्रवार दि. 20 रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे येवुन  श्री  तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येऊ दे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ देत असे श्री तुळजाभवानी मातेस साकडे घातले.

यावेळेस पत्रकाराशी बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या मनुष्य रुपी राक्षसांचा महिषासुर मर्दिनी नक्कीच वध  करेल असे यावेळी म्हणाले. यावेळेस शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुखला शामल वडणे, सोलापूर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा उपनेत्या अस्मिता  गायकवाड, तसेच पंढरपूर महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनम अभंगराव तसेच लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील, युवासेना सचिव अक्षय ढोबळे, माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव,शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, सागर इंगळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले आदी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top