तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव कालावधीत श्री तुळजाभवानी दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाचा सोयीसाठी घाटशिळ रोड वाहनतळ येथे 100 बाय 200 फुट आकाराचे भव्य विस्तीर्ण असृ  सर्वसोयीनु युक्त असे वाँटरप्रफु मंडप उभारले आहेत. 

यातील ऐका मंडपात दहा हजार भाविक थांबणार असल्याने दोन्ही मंडपात ऐकाच वेळी वीस हजार भाविक थांबु शकणार आहेत. सदरील  वाहनतळ जागा पाच ऐकर असुन त्यात तीन ऐकरात हे  मंडप असुन उर्वरीत जागेत  पोलिस नियंत्रण कक्ष क्लाँकरुम  प्रथमोपचार केंद्र  चप्पल स्टँड पाणपोयी पेड दर्शन केंद्र येथे कार्यान्वित केले आहेत.सदरील घाटशिळरोडवाहनतळ दर्शन मंडपातुन शनिवारी दि 14 आँक्टोबर पासुन भाविकांना देवीदर्शनार्थ सोडले जाण्याची शक्यता आहे शारदीयनवराञ उत्सवातील घटस्थापना ते अश्विन पोर्णिमा नंतर येणाऱ्या मंगळवार पर्यत साधारणता  जवळपास सतरा ते अठरा दिवस येथुन भाविकांना दर्शनार्थ सोडले जाणार आहे. सदरील दर्शन मंडपात एलईडीस्क्रीन ठेवले जाणार असुन रांगेतील भाविकांना देविच्या चालु विधी दर्शन रांगेतुन पाहता येणार आहेत भवानीतिर्थ कुंड शेजारीच असल्याने येथे भाविकांनी स्नान केले कि थेट वाहनतळातील दर्शन मंडपात दर्शनार्थ भाविकांना जात येणार आहे.येथे धर्म मुख अभिषेक सशुल्क दर्शन अशा रांगा असणार आहे येथुन भाविक थेट दर्शन मंडप ते देविपर्यत पोहचणार आहे.                   


दर्शन मंडप रस्त्यावर दुकाने थाटण्यासाठी जागे पकडणे सुरु !    

घाटशिळ रोड वाहनतळातुन दर्शनार्थ सोडले असल्याने येथे व्यवसायासाठी जागे पकडण्यासाठी व्यवसायीकांची धावपळ सुरु झाली आहे.


 
Top