तुळजापूर (प्रतिनिधी)- नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा केंद्रीय युवक महोत्सव 2023 संपन्न झाला. या मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयचा संघ सहभागी झाला होता. महाविद्यालयाने शोभायात्रा या कला प्रकारात द्वितीय तर ललित कला मधे कोलाज या कला प्रकारात तृतीय पारितोषिक मिळविले.
या यशा बद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांनी सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, संघ प्रमुख प्रा. डॉ. शशिकला भालकरे सहकारी मार्गदर्शक प्रा.रत्नाकर उपासे, प्रा. डॉ. मंदार गायकवाड, राजाभाऊ बनसोडे, प्रकाश कुंभार सहभागी विद्यार्थी कलावंत विध्यार्थी -विद्यार्थीनीं बेलुरे साक्षी, बनकर वैष्णवी,रेणके प्राजक्ता,स्वराली सरडे, निशिगंधा भोवाळ,सलोनी काळे,विकी खडचे, तेजस देठे, उमेश माळी, विश्वतेज पवार यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला आणि अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, मा.सिनेट सदस्य प्रा.संभाजी भोसले, प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी अभिनंदन केले. यावेळी
नॅक समन्वयक डॉ. प्रवीण भाले, डॉ. पांडुरंग शिवशरण, प्रा. कुमार खेंदाड,डॉ. अमोद जोशी यांची उपस्थिती होती.