तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र वीरशैव सभा  धाराशिव  जिल्हा पदाधिकारी, प्रांतिक समिती सदस्य व सभासद यांची बैठक  रविवार दि 16 रोजी प्रदेश समिती उपाध्यक्ष एस. एस. मलंग यांचे उपस्थीतीत होवुन त्यात खालील जिल्हा समिती पदाधिकारी यांची निवड करण्यात आल्या. 

जिल्हाअध्यक्ष प्रफुल्लकुमार शशिभारत, कार्याध्यक्ष शिवशंकर महंतअप्पा माळगे, सचिव ॲड. सुहास सुरेश तानवडे, सहसचिव ॲड. प्रदिप निळकंठप्पा पणुरे, कोषाध्यक्ष सिद्राम विश्वनाथ देशमुख, महिला शाखा जिल्हाध्यक्ष दिपा नागनाथ मस्के, प्रांतीक सदस्य प्रकाश बसवणप्पा वाकडे, सचिन रेवणसिध्द वाले, सदस्य सिद्रामप्पा खराडे,  दिगंबर शरणप्पा माळगे, सुधीर माल्लीकार्जुनप्पा येणेगुरे, चंद्रशेखर सुरेशराव कदेरे नवनियुक्त पदाधिकारी यांचे हार्दीक अभिनंदन करुन व भावी कार्यकालासाठी त्यांना शुभेच्छा चंद्रशेखर होनराव प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र वीरशैव सभा यांनी दिल्या. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. विवेक कोरे यांनी केले.


 
Top