भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील दिंडोरी येथे सोयाबीन करताना सोयाबीनच्या मशीनमध्ये अडकून मेघराज भाऊसाहेब कसाब वय 24 रा सौंदरे ता बार्शी, जि सोलापूर या तरुणाचा जागीच करून अंत झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार दि 21 रोजी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मेघराज कसाब हा भूम तालुक्यातील दिंडोरी येथील त्याचे मावस भाऊ ऍड चंद्रकांत डंबरे यांच्या शेतामध्ये सोयाबीनचे पीक करण्यासाठी स्वतःच्या मालकीची सोयाबीन करण्याची मशीन घेऊन आला होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मेघराज व त्याच्या मावस भावाच्या कुटुंबातील सदस्य व काही मजूर त्या ठिकाणी मशीन मध्ये काढलेले सोयाबीन टाकत होते. 

यावेळी त्या ठिकाणी मशीनला असलेले झाकण तुटले. यावेळी तो त्या ठिकाणी काय झाले म्हणून पाहण्यासाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती कळताच भूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पवार पोलीस कर्मचारी श्री पोळ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो मृतदेह मशीन मधून बाहेर काढून भूम येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला.


 
Top