तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रविवार दि. 15 ऑक्टोबर रोजी आई राजा उदो..उदो..सदानंदीचा उदो..उदो..च्या गजरात संभळाच्या कडकडाटात घटस्थापना करण्यात येवुन शारदीय नवराञ उत्सवास मोठ्या उत्साहात आरंभ झाला. 

भाद्रपद वद्य अष्टमीला  निद्रिस्त करण्यात आलेली  तुळजाभवानी देवीची मुख्य मूर्ती रविवारी पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापीत करण्यात आली. त्यानंतर देविजींना भाविकांचे अभिषेक घालण्यात आल्यानंतर नित्योपचार पूजा करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता मंदिरातील श्रीगोमुखापासून विविध धार्मिक वाद्यांच्या गजरात जलकुंभ वाजत गाजत मिरवणूकीने मंदिरात आणुन गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिर समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे व त्यांच्या सौभाग्यवती, देवीचे महंत तुकोजी बुवा, हमरोजी बुवा, पाळीचे भोपे पुजारी डॉ. अक्षय शशीकांत पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, अर्चना पाटील, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, मंदिर प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी, तहसीलदार अरविंद बोळंगे, पो. नि. गजानन घाडगे, वित्त व  लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे, धार्मिक सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक, सिध्देश्वर इंतुले, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन सांळुके, भोपे मंडळाचे शशीकांत, अतुल मलबा, प्रशांत सोंजी, विपीन शिंदे, प्रा.धनंजय लोंढे, किशोर गंगणे, उपाध्य मंडळाचे कोंडो ढोल, प्रयाग कांबळे सह मंदिरातील मानकरी सेवेदार, भोपे पुजारी व  हजारो भाविक उपस्थित होते. रात्री हजारो भक्तांच्या उपस्थितीत मंदिर प्रांगणात श्री देवीजींचा छबिना काढण्यात आला. नंतर महंत महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजी बुवा  यांनी प्रक्षाळ पुजा केली. नंतर मंदिर बंद करण्यात आले.


 
Top