तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील श्री तुळजाभवानी नेत्रालयाच्या वतीने गुरुवारी (दि. 12)  रोजी बारुळ ता. तुळजापूर येथे आयोजित शिबिरात 200 गरजुंची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. 

या शिबीराचे उदघाटन शहाजी सुपनार नबीलाल शेख. संदीप गंगणे, बाबुराव ठोंबरे, संजय ठोंबरे, अनिल यावलकर, वैजीनाथ ठोंबरे, प्रभाकर ठोंबरे, सिद्राम वट्टे अदि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील मारूती स्कायलाइन मल्टीपर्पज सोशल फाऊंडेशन संचलित श्रीतुळजाभवानी नेत्र रुग्णालयच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. यात डॉ. गीतांजली कुंडलिक माने सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ यांच्या यांनी मोतीबिंदू, डोळ्यावर मास आलेले तसेच कमी दिसणे आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी करुन उपचार केले.  रक्तदाब, मधुमेय यामुळे डोळ्यावर होणाऱ्या परिणामाच्या बाबतीत सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले यावेळी या उपक्रमाला डाँ मोहन वट्टे डाँ माने यांनी सहकार्य केले या प्. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रणित देशमुख, पायल हवले, जयश्री पवार यांच्यासह श्री तुळजाभवानी नेत्रालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम

घेतले.


 
Top