तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील दोन युवकांचा वेगवेगळ्या अपघातात दुर्दवी मुत्यु झाल्याची हदयद्रावक घटना मंगळवार दि. 10 रोजी राञी 9.00वा घडली. या घटनेने शहरात सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहिल्या घटनेत शहरातील गणेश कालिदास भोसले 44 हे मंगळवार दि. 10रोजी राञी 9 -00 वा आपल्या घराचा टेरेसवर वाँकींग करत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने खाली पडुन यात ते मयत झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आई वडील भाऊ असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत शहरातील आराधवाडी भागातील मंगळवार सागर विलास इंगळे 28 हा मोटार सायकल वरुन घाटशिळ घाटातील वळणावर आला असता सरकिचा ट्रक कलडल्याने त्या खाली मोटार सायकल सह सापडुन तो मयत झाल्याची घटना घडली ही घटना मंगळवार दि. 10रोजी राञी 9 वा घडली सदरील मयत सरकी पोते दुसऱ्या गाडीत भरत असताना सापडले.