नळदुर्ग (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नळदुर्ग पोलिस ठाणा हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी धाराशिव जिल्ह्यातुन तडीपार केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

नळदुर्ग पोलिस ठाणा हद्दीतील रोहन दिलीप उर्फ राम शिंदे वय 21 वर्षे रा.भोई गल्ली नळदुर्ग,फयाज उर्फ फजीत आलिफा बाबु मौजन वय 19 वर्षे रा.किल्लागेट नळदुर्ग व कैलास शिवाजी साळुंके वय 28 वर्षे रा. अणदुर हे सराईत गुन्हेगार यांच्या विरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदरील गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारी टोळी तयार करून सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत माजवुन गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य करीत होते. त्यांच्यावर वेळोवेळी कायदेशीर कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात फरक पडला नाही.त्यांच्या गुन्हेगारी कृत्यास कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सदर टोळी म.पो. का.क 55 प्रमाणे हद्दपार करण्याचा प्रस्ताव नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा प्रस्ताव पोलिस अंमलदार एस. पी. कांबळे यांनी तयार करून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सादर करण्यात आला.सदरील प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सदर इसमाना दि.10 ऑक्टोबर 2023 रोजी संपुर्ण धाराशिव जिल्ह्यांतुन तीन महिन्याच्या कालावधीकरीता तडीपार करण्यात आले असल्याचे आदेश पारीत केले आहे. सदरचा आदेश लागु झाल्यापासुन रोहन दिलीप उर्फ राम शिंदे,फय्याज उर्फ फजीत आलिफा बाबु मौजन व कैलास शिवाजी साळुंके यांना धाराशिव जिल्हा व तालुक्यांतुन तडीपार करण्यात आले आहे. सदरचे इसम कुणाला हद्दपार करण्यात आलेल्या तालुक्यामध्ये दिसुन आल्यास नळदुर्ग पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी केले आहे.


 
Top