नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील राजेंद्र स्वामी यांनी आपला मुलगा कै. ओंकार स्वामी याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त येथील आपलं घर प्रकल्पातील अनाथ मुलांना सकाळचा नाष्ठा व चहा तसेच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्रात भाविकांना महाप्रसाद दिला.

गेल्या वर्षी राजेंद्र स्वामी यांचा एकुलता एक मुलगा ओंकार स्वामी याचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने अगदी कमी वयात निधन झाले होते. दि.14 ऑक्टोबर रोजी कै. ओंकार स्वामी याची पहिली पुण्यतिथी होती यादिवशी राजेंद्र स्वामी यांनी आपल्या मुलाच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त नळदुर्ग येथील आपलं घर प्रकल्पातील अनाथ मुलांना सकाळचा नाष्ठा व चहा दिला त्याचबरोबर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भाविकांना महाप्रसाद दिला यावेळी राजेंद्र स्वामी, दिनेश बाळूरकर यांच्यासह संपुर्ण स्वामी कुटुंब उपस्थित होते.


 
Top