धाराशिव (प्रतिनिधी)-कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगर नवरात्रोत्सव समितीच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या देवीची भव्यदिव्य छाबिना मिरवणूक काढण्यात आला. त्यानंतर देवीची महाआरती करुन नवरात्र महोत्सवातील धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मिरवणुकीच्या प्रारंभी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी ठाकरेनगरसह परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला. प्रभाग चार मधील प्रमुख मार्गावरून ही छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला मुली यांची उपस्थिती लक्षणीय होती. छबिना मिरवणुकीत महिला व युवतींनी पोत खेळणे दांडीया खेळणे तसेच महीला कार्यकारणी सदस्य यांना साडी चोळी आहेर प्रशांत साळुंखे यांच्या वतीने देण्यात आला वेष भूषा स्पर्धा डान्स स्पर्धा घेण्यात आल्या व इतर उपक्रम राबविले. तत्पूर्वी नवरात्र महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत साळुंके यांनी सर्व देवी भक्ताचे स्वागत करून आभार मानले. नवरात्र महोत्सव कालावधीत ठाकरेनगर नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे महिला, युवती व विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, संगीत खुर्ची, आराधी गीतांचा मेळा यासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी  घटस्थापनेपासून दररोज सकाळी भोगी नित्यपूजा, व सायंकाळी महाआरती, मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांना व देवी भक्तांना 151 तुळशी रोप देन्यात आले. नऊ दिवस आरतीनंतर फराळ अन्नदात्यामार्फत वाटप केले असे दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमाला ठाकरेनगर, अष्टविनायक चौक, संभाजी नगर नारायण कॉलनी शाहूनगरसह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


 
Top