उमरगा (प्रतिनिधी)-लोहारा व उमरगा तालुक्याच्या सीमावर्ती भागात असणारे रुद्रवाडी हे गाव गावाने “ एक गाव एक गणपती“ ही संकल्पना  राबवली आहे. गावात एकच गणपती बसवून विधीवत मनोभावे सेवा केली. गावकऱ्यांनी दिलेल्या वर्गणीच्या माध्यमांतून गणपती मंडळांने डॉल्बीमुक्त मिरवणूक काढली. पारंपारिक पद्धतीचे वाद्य, लेक्षीम नृत्य, विविध ऐतिहासिक धाडसी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवत मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे गणपती मंडळाचा खर्च अत्यंत कमी झाला. वर्गणी मधून उरलेल्या रक्कमेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास व पॅड अशा शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. 

खऱ्या अर्थाने शैक्षणिक व गर्जाधिष्ठित विद्यार्थ्याला शिक्षणासाठी प्रवृत्त केले. समाजातील पैसा, समाजातील लोकांच्या हितासाठी, सामाजिक हितासाठी व सर्वागीण विकासाठी वापरण्याची संकल्पना मंडळाच्या माध्यमातून करण्यात आली. आज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती माने, जगन्नाथ मोरे, भरत शिंदे, परसू मोरे, कापड दुकानदार विनोद साळुंखे साहेब, लक्ष्मी गायकवाड, विमल गायकवाड सहशिक्षिका झुंजारे मॅडम यांच्या शुभाहस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षाणिक साहित्याचे व विविध खेळातील बक्षिसांचे वितरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक गोविंद घारगे यांनी मंडळाचे आभार मानले. गणेश मंडळाच्या विधायक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top