तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा परिसरातील चिंचखोरी भागात चरावयास गेलेल्या शेळ्यां पैकी एक शेळीवर बिबट्या सदृश्य हिस्ञ पाण्याने हल्ला केल्याने सदरील शेळी जागीच मरण पावल्याची घटना गुरुवार दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 ते 4.45 वाजण्याच्या सुमारास घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेने बालाघाटात बिबट्या  दाखल झाला कि काय या भितीने पशुपालकांसह ग्रामस्थांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले आहे. आपसिंगा पंचक्रोषीत असणाऱ्या चिंचखोरी परिसरात गवळी हे नेहमी प्रमाणे आपल्या शेळ्या घेऊन गेले असता पावणे पाचच्या सुमारास त्यांचा एका शेळीचे मुढक्याचे लचके तोडल्याने ती मरण पावलेली दिसुन आली. हा बिबट्या होता कि आणखी कुठला हिंसक प्राणी होता या बाबतीत माहिती मिळु शकली नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच विजय क्षिरसागर अनेक ग्रामस्थ तिथे पोहचले व पाहणी केली. बिबट्या सदृश्य हिस्ञ पाण्याचा वन खात्याने  बंदोबस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय क्षिरसागर यांनी केली आहे.


 
Top