तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथे दोन हजार वर्षांपूर्वी आधुनिक तंत्रज्ञान व अत्यंत अभ्यासपूर्ण तत्रज्ञ होते.याचा सक्षम पुरावा म्हणचे तेर येथील तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे यांच्या खाजगी संग्रहालयात असलेली सिताफळाच्या आकारामध्ये कोरलेली हस्तीदंती अत्तरदानी होय.

सिताफळाच्या दृश्य स्वरूपातील बाटलिचा आकार उंची 44मि.मि.व व्यास 41 मी.मि.असलेल्या अत्तराच्या कुपीच्या माध्यमातून दोन हजार वर्षांपूर्वीचे प्रगत इंजिनिअरीग आणि इंजिनिअरिंग मशिनरी व त्यातील आधुनिक तंत्रज्ञान सिद्ध करणारी वस्तू धाराशिव तालुक्यातील तेर येथील तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे यांच्या खाजगी संग्रहात आहे.यामध्ये सिताफळातील खवले वरून खाली मोठे होत जातात व त्या खवल्यालाच आधारून ही अत्तराची कुपी उभी राहाते.तिचा उपयोग अत्तर साठविणारी कुपी किंवा बाटली असा केला जात होता.बाटलिचे तोंड बंद करण्यासाठी अटटया दिलेल्या आहेत.तोंड 8.5 मी.मि.रुंद आहे .अत्तर साठविण्यासाठी अतिशय सुबक आहे.30.5 मी.मि.खोल व 18.5 मी.मि.रुंद एवढी पोकळी अत्तर साठविण्यासाठी निर्माण केलेली आहे.या वस्तूचा तक शुद्ध अभ्यास केल्यानंतर हे लक्षात घ्यावे लागेल की, सिताफळाचे डिझाईन व बाटलिचा (कुपी) आकार तयार करण्यासाठी, अत्तर साठविण्यासाठी सुबक पृष्ठभाग असलेली पोकळी निर्माण करण्यासाठी आणि अट्या पाडण्यासाठी लेथ मशिन असलीच पाहिजे.प्लस,मायनस तंत्रज्ञान त्यातील शक्ती व वॉटर टाईटनेस वगैरे सर्व तंत्रज्ञान,त्याची कृती,साधन व उपयोग या सर्वांचे विज्ञान व तंत्रज्ञान त्यांना ज्ञात होते.व ते दररोजच्या उपयोगात आणत होते हे सिद्ध होत आहे.

(दोंन हजार वर्षांपूर्वीचे प्रगत इंजिनिअरीग आणि इंजिनिअरिंग मशिनरी व त्यातील आधुनिक तंत्रज्ञान सिद्ध करणारी ही हस्तीदंती अत्तरदानी आहे. - श्री रेवणसिद्ध लामतुरे,तगर अभ्यासक, तेर)


 
Top