तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील घटस्थापनेसाठी लागणारे श्रीफळ भोगी करुन नेण्यासाठी कर्नाटकातील भाविकांचा मंगळवार पासुन ओघ सुरु झाला आहे. हा कर्नाटक राज्यातील भाविकांचा ओघ घटस्थापना दिना पर्यत असणार आहे.           

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेचे कर्नाटकात कोट्यावधी भक्त असुन ते देविजींचा शारदीय नवराञ उत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक परंपरचे पालन करीत साजरा करतात. श्री तुळजाभवानी मातेच शारदीय नवराञ उत्सव रविवार दि. 15 रोजी  घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर घटस्थापनेसाठी लागणारे श्रीफळ श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपारिक पुजारी वृंदाच्या हस्ते विधीवत भोगी करुन घेऊन जाण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर शारदीय नवराञ उत्सवपुर्वी देविजींच्या मंचकी निद्रा काळात देविजींचा वारापासुन  मंगळवार भाविक तिर्थक्षेञी तुळजापूरात येवुन श्री तुळजाभवानी मातेचा कुलधर्मकुलाचार करुन यातील श्रीफळ गावी नेवुन ते घटस्थापनेसाठी कलशात ठेवुन घटस्थापना करतात. या पार्श्वभूमीवर मंगळवार रोजी दहा हजार भाविकांनी गर्दी केली होती.


 
Top