धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस मुख्यालयातील क्रिडांगणावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन दि. 06 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 05.00 वाजेच्या सुमारास संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व खेळाडूंनी सदर क्रिडा स्पर्धा निकोप वातावरणात खिलाडू वृत्तीने पार पाडावी यासाठी शपथ घेतली. तसेच यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी निरोगी शरीरात निरोगी मन वास करते व खेळातुन व्यक्तीमत्व विकास, नेतृत्व साधता येते, असे मनोगत व्यक्त करत सर्व खेळाडूना शुभेच्छा दिल्या.

पोलीसांच्या क्रिडा गुणांना वाव मिळावा, त्यांची शारिरीक व मानसिक क्षमता उंचवावी, संघभावना निर्माण व्हावी या उद्देशाने धाराशिव पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालयातील मैदानावर  दि. 06 ऑक्टोबर ते दि. 12 ऑक्टोबर दरम्यान क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय अशा पाच पोलीस घटक दलातील एकुण 450 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत खो-खो, कबड्डी, हॅड बॉल, बास्केट बॉल, व्हॉली बॉल, फुटबॉल, हॉकी, 100 मीटर-400 मीटर- 5,000 मीटर धावणे, अडथळा शर्यत, जलतरण, तायकाँदो  असे विविध क्रिडा प्रकार खेळले जाणार आहेत.

या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक .नवनीत काँवत यांसह पोलीस  उप अधीक्षक स्वप्नील राठोड, पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे, श्रीनिवास कानगुडे, पोनि यशवंत जाधव, रापोनि अरविंद दुबे, सपोनि सचिन पंडीत, सिध्देश्वर गोरे, शाम डोंगरे यांसह स्पर्धेकरीता आलेले पाचही घटकातील सर्व खेळाडू, इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.


 
Top