वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुका हा 52 गावाचा छोटा तालुका असून शंभर व्यापारी शेतमाल खरेदी करून वैयक्तिक हीत साधत आहेत. परंतु यापुढे व्यापाऱ्यांनी अधिकृत परवाना घेऊन शेतमालाची खरेदी करावी अन्यथा व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हे नोंदविले जातील, सध्या बाजार समितीवर एक कोटी 63 लाख  कर्ज असून शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास चेहरा मोहरा बदलण्यास कटीबद्ध राहील अशी माहिती सभापती रणजीत गायकवाड यांनी पत्रकार परिषद दिली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहाय्यक निबंधक सोनवणे डी.एस., सभापती रणजीत गायकवाड, संचालक काकासाहेब मोरे,कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी बंद पडलेला जनावरांचा बाजार सुरू करून जनावरांच्या स्वच्छतेसाठी हौद, निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्याचे सभापती रणजीत गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी नवनियुक्त प्रभारी सचिव दत्तात्रय वाघ यांनी बाजार समिती विकास व इतर ध्येय धोरणाबद्दल बोलताना सांगितले की, बाजार समिती अर्थकारणाचे मुख्य स्त्रोत असून त्यामुळे बाजारपेठेत उलाढाल होऊन अर्थकारणास चालना मिळू शकते.  शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच बाजार समिती सुद्धा सक्षम होणे गरजेचे आहे. वाशी परिसरातील शेतमाल शेतकरी इतरत्र जाऊन विक्री करतात एवढेच काय पण वाशी तालुका हा राजमा पिकाचा मुख्य उत्पादक असून व्यापारी दुसऱ्याच्या नावे देशभरात विक्री करतात.


 
Top