तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी  मातेचा  दर्शन मंडप  प्रशासकिय कार्यालय व उंबर झरा या  जागेत करण्यात यावा या मागणीसाठी  श्री तुळजाभवानी भक्त विकास आराखडा कृती समितीने बुधवार दि 10 रोजी पुकारलेल्या बंद ला मोठा प्रतिसाद लाभला. या बंद मध्ये शहरातील  व्यापारी वर्गानी आपली दुकाने बंद ठेवुन यात सहभाग नोंदवला आहे. 

बुधवार सकाळी छञपती शिवाजी महाराज पुतळ्या पासुन रँली काढण्यात आली. ती महाध्दार समोर आल्यानंतर येथे शासनाला, अधिकारी वर्गास उंबरझरा येथे  दर्शन मंडप करण्याची सदबुध्दी दे असे साकडे घालण्यात आले. बंदमुळे भाविकांना साधे पिण्याचे पाणी सुध्दा न मिळाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले. श्री तुळजाभवानी मंदिरात माञ या बंद काळात दर्शन व्यवस्थित चालु होते.  बंद मध्ये श्री तुळजाभवानी भक्त विकास आराखडा कृती समिती  काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट,  शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार गट) सह तिन्ही पुजारी मंडळ पदाधिकारी कार्यकते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंद पार्श्वभूमीवर शहरात कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.    


माजी मंञी चव्हाण सर्वाशी संवाद साधत - रुषी मगर        

माजी मंञी माजी आमदार मधुकर चव्हाण हे श्री तुळजाभवानी मंदिरचा विषय आला की  तात्काळ पुजारी, व्यापारी, नागरिक व अधिकारी यांच्याशी संवाद साधुन संघर्ष टाळत होते. त्यामुळे नवराञोत्सवापुर्वी कधी ही बंद सारखे  संघर्षमय वातावरण निर्माण  होत नव्हते. माञ आता हा संवाद होत नसल्याने बंद सारखी दुर्दवी घटना प्रथमच तिर्थक्षेञ तुळजापूरात घडल्याची प्रतिक्रिया युवा नेते रुषि मगर यांनी बंद बाबतीत बोलताना प्रतिक्रिया दिली.


 
Top