भूम (प्रतिनिधी)- सध्याच्या युगात शिक्षक डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी वर्गाचेच मुले शिक्षण घेऊन उच्चपदस्थ स्थानावर विराजमान होत आहे. परंतु बऱ्याच ठिकाणाहून  वृत्तपत्राच्या माध्यमातून असे दिसून येते की रिक्षावाला, चहावाला, सायकल दुकानदार आदी गरीब कुटुंबातील मुले सुद्धा आयएएस,एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्चपदस्थ पदावर विराजमान होत आहे. परंतु दररोज सर्वांच्या घरी पहाटे चहाच्या वेळेस जगभरातल्या बातम्यांचे वाचन करण्यासाठी जो आपल्या दारोदारी येतो अशा पेपर वृत्तपत्र विक्रेतेचे मुलांचे सुद्धा शिक्षणामध्ये भरारी घेत असल्याचे चित्र सध्या भूम शहरात दिसत आहे                                   

भूम शहरातील वृत्तपत्र विक्रेते अरविंद खंडेराव शिंदे यांचे लहानपण भूम बस स्थानकावर ते पेपर विक्रेता आहेत. त्यांनी आपल्या दोन मुलांना उच्चपदस्थ शिक्षण मिळावे या हेतूने अथक परिश्रम घेऊन शिक्षण दिले. यातूनच मुलगा पेट्रोकेमिकल अभियंता बनला सध्या इंडो जर्मन पेट्रोकेमिकल लिमिटेड तळोजा या कंपनी मध्ये कार्यरत आहे. तर मुलगी होमिओपॅथिक डॉक्टर होत आहे. अरविंद शिंदे यांची मुलगी डॉ. साक्षी अरविंद शिंदे

काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहमदनगर या ठिकाणी शिकत आहे. काही का असेना अरविंद शिंदे यांचा व मुलांचा भविष्यकाळ उज्वल आहे म्हणायला हरकत नाही.


 
Top