परंडा (प्रतिनिधी) - आज रोजी धाराशिव येथे झालेल्या जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत कल्याणासागर विद्यालय डोमगावची विद्यार्थीनी कुमारी रजनीगंधा बिभीषण मिस्कीन हिने  जिल्हयात द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ.सुजितसिंह ठाकूर, सचिवा प्रज्ञा कुलकर्णी, मार्गदर्शक विकास कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, कल्याणासागर विद्यालय परंड्याचे मुख्याध्यापक किरण गरड, क्रिडाशिक्षक राजाभाऊ शिंदे तसेच अंगद लांडगे, दादासाहेब सुरवसे, कुंडलिक चव्हाण, सारंगसिंह ठाकूर, महादेव जाधव, सतीश चौधरी, संतोष माळी व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 
Top