धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे येथे दिनांक 4 ते 7 ऑक्टोबर 2023 या कालावधीत युवक महोत्सवाचे आयोजन केले होते या युवक महोत्सवात रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकगीत, समूहगीत ,पोवाडा, वक्तृत्व, वादविवाद व काव्यवाचन इत्यादी स्पर्धेत सहभाग घेण्यात आले. या स्पर्धेत विविध कलाप्रकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत प्रतीक प्रकाश गायकवाड एम.कॉम.भाग 2 या विद्यार्थ्यांने या विद्यापीठ स्तरावरील युवा महोत्सवात तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या यशामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी बुके देऊन अभिनंदन आणि सत्कार केले. या युवा महोत्सवासाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी गायकवाड,डॉ. स्वाती शिलवंत यांनी परिश्रम घेतले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याच्या या यशामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


 
Top