भूम (प्रतिनिधी)- धाराशिव येथे पार झालेल्या जिल्हास्तरीय लांब उडी स्पर्धेमध्ये यशोदीप प्रमोद कांबळे व उंच उडी स्पर्धेत वेदांत योगीराज आमगे या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 3 हजार मीटर धावणे या स्पर्धेत समृद्धी नामदेव कारकर या खेळाडूने जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक मिळवला . 

या तिन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक धनंजय पवार यांच्या हस्ते खेळाडू व मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. व्ही. पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, क्रीडा मार्गदर्शक अमर सुपेकर, कमलाकर डोंबाळे हजर होते.


 
Top