तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेचे शारदीय नवराञ उत्सव रविवार दि15 पासून आरंभ होण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. 12 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे गुरुवारी दाखल होताच श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. नंतर मंदिर प्रांगण, मातंगी देवी मंदिर, वाहनतळ जागा सह गर्दीच्या ठिकाणी पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेवुन मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत,पोलिस उपअधीक्षक, तुळजापूर निलेश देशमुख ,पोलिस निरीक्षक गजानन घाडगे व तुळजापूर पोलिस ठाणे व इतर अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.