धाराशिव (प्रतिनिधी)- पाडोळी येथे केंद्रातील व राज्यातील भाजपा प्रणित सरकारची पोकळ आश्वासने व बोलघेवड्या योजनांची वस्तुस्थिती जनते समोर मांडणारे पुस्तक भाजपा प्रणित सरकारने कशी व कोणत्या पध्दतीने फसवणूक केली आहे याची माहीती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पुस्तक काढण्यात आलं आहे. “ होऊ द्या चर्चा “अभियानाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील जनतेची भाजप प्रणित  सरकारने कशी व कोणत्या पद्धतीने फसवणूक केली आहे याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या आदेशानुसार चालू आहे असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, नंदूराजे निंबाळकर, अरुण नारकर, सतीश सोमाणी ,नितीन शेरखाने, कल्याण गुंड, रवि कोरे, विक्रम पाटील, महेश पोद्दार, मोइन पठाण, अमोल मुळे,अविनाश इंगळे, व्यंकटराव गुंड, उप तालुका प्रमुख सौदागर जगताप,धनंजय इंगळे, राजाभाऊ भांगे,झुंबर बापू भोसले,सुनील शेटे,(सरपंच), युवराज जाधव (उपसरपंच),गोवर्धन भोसले, सिकंदर मुलानी,ज्ञानदेव चव्हाण,कृष्णा परदेशी,कुमार परदेशी आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top