वाशी (प्रतिनिधी)- शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता दहावी वर्गात शिकत असणारा संग्राम अशोक कांबळे रा. पिंपळगाव (लिंगी) यांनी शाळेच्या बाथरूमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मिळालेली माहिती अशी की ,संग्राम अशोक कांबळे हा रा. पिंपळगाव (लिं) येथे मुक्कामी राहत होता. त्याचे वडील सरमंकुडी कडे आयआरबी रोड वरती कामाला जात होते. संग्राम व त्याच्या लहान भावाला वडिलांनी छत्रपती शिवाजी विद्यालयात मोटर सायकलवर सोडून कामाला गेले होते.संग्रामने शाळेचे तीन तास केले व लंच ब्रेक सुट्टी झाल्यावर संग्रामने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या लोखंडी ॲगला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी एक वाजता शाळेची मधली सुट्टी झाल्यावर विद्यार्थी बाथरूम मध्ये गेल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही.