धाराशिव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय शाळांच व नोकर भरती खाजगी यंत्रणेद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे मागासवर्गीय,गोरगरीब,शेतकरी यांची मुले शिक्षण घेऊ शकणार नाहीत खाजगी संस्थानी शिक्षण अतिशय महाग केलं आहे हे सर्व सर्वसामान्य वर्गाला परवडणार नाही. शिक्षणाच्या बाबतीत खाजगीकरण करण्याचा घेण्यात आलेला निर्णय सरकारने तात्काळ रद्द करावा. तसेच शासकीय निमशासकीय सेवेतील अ ब क ड श्रेणीची पदे खाजगी यंत्रणे मार्फत भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तो निर्णय चुकीचा आहे खाजगी संस्था/एजन्सी/यांना मोठे करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे कंत्राटी नोकर भरती चा ठेका राज्यातील नऊ खाजगी संस्था/एजन्सीला दिला आहे यातील काही संस्था/एजन्सी राज्याच्या बाहेरील आहेत सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी उमेदवाराकडून परीक्षा घेऊन गुणवत्तेवर आधारित भरती केली जात होती गेली अनेक वर्षापासून सरकारने खाजगीकरणाचा सपाटा सुरू केला आहे या निर्णयामुळे गुणवत्ता व शिक्षण याला महत्व राहणार नाही खाजगीकरणाच्या माध्यमातून मागासवर्गीयाचे आरक्षण बंद करण्याचा राज्य सरकारने डाव रचला आहे.

 सरकारी शाळा व शासकीय नोकर भरती करिता खाजगीकरण करण्यासाठी काढलेले जी आर त्वरित रद्द करावेत अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, धाराशिव तालुकाध्यक्ष संपत सरवदे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मस्के, किरण आवटे आदींच्या  स्वाक्षर्या आहेत.


 
Top