नळदुर्ग (प्रतिनिधी)- महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त किल्ले सफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत आज येथील राज्य संरक्षित नळदुर्ग किल्ल्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुळजापूर व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग मधील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 14 मुली, 85 विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील 20 विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रमदान केले.

उपली बुरुज परिसर व नरमादी तलावाच्या पुर्वेकडील परिसरावरील गवत व झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य बिराजदार, शिल्प निदेशक शमशोद्दीन शेख, प्रतिक शिंदे, सूजीत नाईकवाडे, ज्योतिबा पोळ, विजय वीर, राजू गायकवाड, सलीम तांबोळी, जीवन रणखांब, स्मिता शिंदे व शिला दोडके तसेच नळदुर्ग महाविद्यालयातील प्रा. ॲड पांडुरंग पोळे, प्रा. परवेझ पिरजादे, प्रा. बाळासाहेब दराडे, प्रा. शाहुराज कांबळे, लिपिक विनायक राठोड यांनी परिश्रम घेतले.


 
Top