तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवात लाखोच्या संखेने भाविक येणार असल्याने भाविकांची व नागरिकांंची गैरसोय होवु नये याची दक्षता घ्यावी व घटस्थापने पुर्वी सर्व कामे पुर्ण करावीत असे आवाहन मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी नवराञोत्सव पुर्वतयारी अनुषंगाने नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी यांच्या बैठकीत केले.    

यावेळी बोलताना मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी प्रथम शारदीय नवरात्र महोत्सव अंतर्गत चालू असलेल्या विविध कामाच्या प्रगती बाबतचा आढावा घेतला व त्या अनुषंगाने त्यांनी सर्व कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.  तसेच अतिक्रमण, पाणीपुरवठा, स्वच्छता, दर्शन मंडप इत्यादी कामे यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही दिल्या.                    

शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये तुळजापूर शहरांमध्ये दररोज लाखोच्या संख्येने भाविक येणार असे गृहीत धरुन सर्वच विभागानी प्राधान्याने कामे करण्याबाबत सर्व कर्मचारी यांना सूचना केल्या.  नगरपरिषदेच्या वतीने भाविक व नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच यात्रा काळात शहरात दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचे नि नियोजन असल्याचे यावेळी स्पष्ट केले  शहरातील व्यापारी यांनी प्लॅस्टीक पिशवी वापरुनये, सोललेले नारळ विक्री व रस्त्यावर , अतिक्रमण करु नये  या बाबत संबंधित पथकांनी पोलिस यंत्रणेच्या सहकार्य ने नियुक्त केलेल्या आदेशातील कर्मचाऱ्यांनी दक्षता घेऊन जबाबदारीने कामे पार पाडावी  असे स्पष्ट केले    सदर बैठकीमध्ये कार्यालय अधीक्षक वैभव पाठक,नगर अभियंता अतुल तोंडारे, नगर अभियंता अशोक संनगले, लेखापाल अमित हेलाले, कर.निर. शिवरत़ अतकरे, रणजित कांबळे, स्वच्छता निरीक्षक -दत्ता साळूंके  सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.शेवटी कार्यालय अधीक्षक यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.


 
Top