तेर (प्रतिनिधी)-शासकीय कृषी महाविद्यालयात स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देशभरात दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवाडा ही सेवा हे विशेष अभियान राबविण्यात आले असून या अभियान अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, धाराशिव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आली.
कचरा मुक्त भारत या संकल्पनेवर आधारित हे अभियान राबविण्यात आले.या मध्ये विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या परिसरातील प्लास्टिक गोळा करण्यात आले व त्याचे योग्य विल्हेवाट लावण्यात आली. त्याच बरोबर परिसरात वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला . यामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. सदरील स्वछताव श्रमदान अभियान डॉ. एम. एस. वाघमारे, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना कृषि महाविद्यालय धाराशिव यांच्या उपस्थितीत व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, डॉ. एम. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. सदरील स्वछता अभियानात महाविद्यालयातील प्रदीप ढाले, ओंकार पाटील, .अदिनाथ फाळके व इतर कर्मचारी व अधिकारी सहभागी होते.