धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिवचे आमदार कैलास  पाटील यांनी काल आपला शब्द सार्थ ठरवत समता गृहनिर्माण सोसायटीला शुद्ध पाण्याचा आरो प्लांटसाठी दहा लाखांचा निधी सुपूर्द केला. 

यावेळी शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे,पंकज पाटील, अभिजित देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पाणी म्हणजे आरोग्याची गुरूकील्ली आणि यासाठी समता सहकार विकास पॅनेलच्या माध्यमातून समता गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष श्री नाना घाटगे व सचिव पकंज पडवळ यांनी समतावासियांना वॉटर एटीएमची सुविधा उपलब्ध करून फक्त 10 रुपयांमध्ये आरोचे 20 लिटर थंड पाणी पुरविण्याची ग्वाही दिली होती.

प्लांट्साठीनाना घाटगे व पंकज  पडवळ  यांचा सतत पाठपुरावा चालू होता. त्याच पाठपुरव्यानंतर आ. कैलास पाटील यांनी काल या प्लांटसाठी मंजुरी देत तात्काळ दहा लाखांचा आमदार निधी मंजूर केला. तसेच जिल्हाधिकारी यांना पत्र देत या कामासाठी लागणारी कार्यवाही तात्काळ चालू करण्यासाठी सूचना दिल्या.


 
Top