धाराशिव (प्रतिनिधी)-आज रूपामाता नॅचरल शुगर्स, युनिट क्र. 1 (पाडोळी) मधून 2023-24 या हंगामात निर्मित झालेल्या पहिल्या गूळ पावडर पोत्याचे पूजन धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड, हरिदास गुंड, शाहुराज गुंड यांच्या शुभहस्ते पार पडले.

परिसरातील शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून, यावर्षी कारखाना लवकर सुरू केला असून, जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे. तसेच उसाला प्रतिटन रू.2800 असा भाव देणार असल्याचे रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड श्री. व्यंकटराव गुंड यांनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांनी रुपामाताला प्राधान्य देऊन उस पाठवावा असे आवाहन गुंड यांनी केले.

यावेळी रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड व्यंकटराव गुंड,कारखान्याचे जनरल मॅनेजर गरड, एम. डी. ॲड. अजित गुंड पाटील, चीफ इंजिनिअर शिलवंत, ॲड. शरद गुंड, रूपामाता अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे असिस्टंट जनरल मॅनेजर विशाल गुंड आदीसह परिसरातील नागरिक, शेतकरी उपस्थित होते.


 
Top