धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा धाराशिव भाजप व युवा मोर्चाच्या वतीने धाराशिव शहरात महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या विरोधात जोडे मारुन, प्रतिमा जाळून निषेध करण्यात आला. धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन नेते शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले व महाविकास आघाडीच्या विरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारच्या नेत्यावर त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमा दहन करून हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अनिल काळे, इंद्रजीत देवकते, विकास कुलकर्णी, मकरंद पाटील, दत्ता सोनटक्के, अभय इंगळे, प्रमोद पाटील, रमण जाधव, उदय देशमुख, वैभव हंचाटे, सिद्धूजीराजे निंबाळकर, पांडुरंग लाटे यांच्या सह भाजप व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भूममध्ये ही आंदोलन
महाविकास आघाडीच्या विरोधात आज भुम गोलाई चौकामध्ये निषेध आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर, भाजपाचे तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, संतोष सुपेकर, अंगद मुरूमकर, प्रदीप साठे, हेमंत देशमुख, सुजित वेदपाठक, ॲड. संजय शाळू, समाधान बोराडे, बाबासाहेब विर, संतोष औताडे, महिला मोर्च्याच्या तालुका उपाध्यक्ष अश्विनी साठे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
परंड्यात ही आंदोलन
परंडा येथे महाविकास आघाडीच्या विरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड जहीर चौधरी, सुबोधसिंह ठाकूर, ॲड. गणेश खरसडे, ॲड. तानाजी वाघमारे, तुकाराम हजारे, युसुफ पठाण, शरद कोळी, महादेव बारस्कर, धनाजी गायकवाड, बाबासाहेब जाधव, साहेबराव पाडुळे, सारंग घोगरे, समीर पठाण, उमाकांत गोरे, श्रीमंत शेळके, अविनाश विधाते, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गिरी, ब्रम्हदेव उपासे, पोपट सुरवसे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.