धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने चालू करण्यात आलेले आंदोलन चांगले पेटले आहे. सो मवार दि. 30 ऑक्टोबर रोजी सोलापूर- धुळे हा महामार्ग धाराशिव एमआयडीसीजवळ जळते टायर टाकून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आजपासून एसटी महामंडळाने जिल्ह्यातील अनेक मार्गावरील बस वाहतूक थांबवली आहे. 

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी 30 दिवसाचा अवधी मागितला असताना जरांगे पाटील यांनी 40 दिवसाचा कालावधी दिला होता. त्यानंतरही सरकारने आरक्षणाबाबत ठोस असे काही निर्णय न घेतल्याने सकल मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या 6 बसेस फोडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी वाहतूक महामंडळाने बंद केली आहे. तर धाराशिव एमआयडीपासून जाणारा सोलापूर - धुळे महामार्ग सोमवारी सकाळी जळते टायर टाकून हायवे बंद केला. दोन्ही बाजूने यावेळी शेकडो वाहनाची रांग लागलेली दिसून आली.


 
Top