धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी येथे दि.02 आक्टोंबर 2023 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
समुद्रवाणी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 704 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 141 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच मिरा हनुमंते, उपसरपंच प्रशांत जंगाले, सामाजीक कार्यकर्ते संतोष हनुमंते, मा. सरपंच शिवाजी पसारे, तंटा मुक्ती अध्यक्ष रामभाऊ गव्हाणे, मा.उपसरपंच युवराज ठोबळे, ग्रा.प. सदस्य नवनाथ घुले, मा. ग्रा. प. सदस्य लक्ष्मण घुले, सतिष कदम प्रा. आरोग्य केंद्र समुद्रवाणी चे डॉ. निशा पथ्थेवार, पसलवाड सर, आशा कार्यकर्त्या डी. बी. ताबोंळी, मेगा फावडे अर्चना मगर निलावती माळी इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. अभिजीत यादव, डॉ. प्रज्वल उखळीकर, डॉ.कपील डोंगरे, डॉ. शिवम येवारे, डॉ. विजय बोराडे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे यांनी परिश्रम घेतले.